पृष्ठे

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

भोसे शाळेत JE लसीकरण अंतर्गत 1 ते 4 सर्व मुलांना मेंदुज्वर ची लस देण्यात आली.

आज भोसे शाळेत पहिली ते चौथी च्यां सर्व विद्यार्थ्यांना JE लसीकरण कॅम्प अंतर्गत मेंदूज्वर ची लस देण्यात आली.

मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेस संगणक भेट

भोसेत जयसिंह अडसूळ यांनी मुलीच्या वाढदिवशी प्राथमिक शाळेस दिले ५० हजाराचे साहित्य Posted on December 14, 2021 by Khabar team किशोरकुमार शिंदे करमाळा, जि. सोलापूर – औषध विक्रेते असणारे तालुक्यातील भोसे येथील जयसिंह अडसूळ यांनी मुलगी राजनंदिनी हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ५० हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्क, संनिटायझर आदि भेट दिले आहे. राजनंदिनी ही भोसेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली इयत्तेत शिकत आहे. चौदा डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस असताना अडसूळ परिवाराने अनावश्यक खर्च टाळून शाळेसाठी साहित्य देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने संगणक संच, मास्क, सँनिटायझर अशा ५० हजार रुपये किंमतींच्या वस्तू शाळेस भेट दिल्या. याशिवाय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सदर निमित्ताने आयोजित कार्यक्रमावेळी सभापती अतुल पाटील, गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुनील अडसूळ आदिंच्या हस्ते संगणक संचाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यावेळी विस्तार अधिकारी अनिल बदे, केंद्रप्रमुख संतोष पोतदार, ग्रामसेवक राम बडे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुनील अडसूळ, शिवशंभो ट्रस्टचे संजय सरडे, अशोक अडसूळ, राजेंद्र पाटील, बापू पवार, नवनाथ बागडे, दौलत रोडगे, संतोष अडसूळ, जनार्धन बागडे, दत्तू पवार उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील जाधव व शिक्षक उमराव वीर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. अडसूळ यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी संगणक व इतर साहित्य देण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल सभापती अतुल पाटील, गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे – पाटील यांनी कौतुक केले. शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असून अडसूळ यांचा आदर्श इतरांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच अडसूळ यांचा सन्मानही केला. यावेळी डॉ. अडसूळ यांनी जयसिंह अडसूळ हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासतात. यापुढेही शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य राहील, असे स्पष्ट केले. याप्रसंगी शाळेच्या वतीने अडसूळ यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले. तर आभार शिक्षक उमराव वीर यांनी मानले. प्रा. करे – पाटील यांच्याकडून स्मार्ट टी. व्ही. सदर कार्यक्रमावेळी बोलताना प्रा. गणेश करे – पाटील यांनी भोसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. याशिवाय शाळेच्या ई – लर्निंग उपक्रमांसाठी यशकल्याणी संस्थेच्या वतीने स्मार्ट टी. व्ही. भेट देण्यात येईल. असे घोषित केले.

रविवार, १९ एप्रिल, २०२०

घरी बसूनच अभ्यास करा

दि.१९एप्रिल २०२०, रविवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* (प्रश्नमंजुषा-१)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
      लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच *पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दि.२० एप्रिल २०२० पासून सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.*
   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

      दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल 2020 दरम्यान ६ अभ्यासमालांमधील घटकांवर आधारित प्रत्येक वर्गासाठी एक प्रश्नमंजुषा आज आम्ही देत आहोत.ही प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर *Submit* केली की लगेच आपल्यासमोर *View Score* असा पर्याय येतो.त्यावर टच केल्यानंतर आपल्याला या प्रश्नमंजुषेत किती गुण मिळाले हे समजेल.त्याचप्रमाणे एखाद्या चुकलेल्या उत्तराचा योग्य पर्याय काय होता हेही समजेल.
    *प्रत्येक वर्गाची प्रश्नमंजुषा सोडवताना आपला मोबाईल क्रमांक(उपलब्ध असल्यास व्हॉटस् अप क्रमांक) पुरवल्यास आपल्याला ही अभ्यासमाला आपल्या मोबाईलवर पाठवणे आम्हाला सोपे जाईल.*

    चला तर मग भाग घेऊया पहिल्या प्रश्नमंजुषेत!

              *प्रश्नमंजुषा - १*

*इयत्ता-पहिली*
https://bit.ly/3cpKuXO

*इयत्ता-दुसरी*
https://bit.ly/2VCgMZ1

*इयत्ता-तिसरी*
https://bit.ly/3bl7lDE

*इयत्ता-चौथी*
https://bit.ly/34PbWLZ

*इयत्ता-पाचवी*
https://bit.ly/2zbi0Tr

*इयत्ता-सहावी*
https://bit.ly/34Pc1iL

*इयत्ता-सातवी*
https://bit.ly/2KaYMQ6

*इयत्ता-आठवी*
https://bit.ly/3bkTkWz

*इयत्ता-नववी*
https://bit.ly/2xDxn6F

*इयत्ता-दहावी*
https://bit.ly/2Vfp9um

 1 ली ते 10 वीच्या सर्व विषयांच्या अभ्यासासाठी दीक्षा ऍपचा वापर करा.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*